आठवड्याचे भविष्य : रविवार 14 ते शनिवार 20 जुलै 2019

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष ः निर्णय घेताना घाई नको

मेषेच्या सुखस्थानात सूर्य प्रवेश, शुक्र-शनी प्रतियुती होत आहे. व्यवसायात चांगली संधी दिसत असली तरी व्यवहाराची बोलणी करताना सावध राहा. नोकरीत निर्णय घेताना घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत डावपेच निकामी करण्याचा प्रयत्न होईल. यशासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.     शुभ दिनांक ः 18, 19

वृषभ ः योजनांना प्रेरणा लाभेल

वृषभेच्या पराक्रमात सूर्यप्रवेश, शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. कुटुंबात वाटाघाटीचा प्रश्न चिघळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचा निर्णय घ्या. योजनांना प्रेरणा देणारी घटना घडेल. उत्साहवर्धक घटना घडेल. परदेशात जाण्याचा योग येईल.    शुभ दिनांक ः 14, 18

मिथुन ः व्यवसायाला कलाटणी मिळेल

मिथुनेच्या धनेशात सूर्यप्रवेश, सूर्य-प्लुटो प्रतियुती होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. गुप्त कारवायांमुळे तणाव होईल. मोठी संधी मात्र समोर दिसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मुद्दे प्रभावी ठरतील. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत प्रगती होईल. सोपा प्रश्नसुद्धा विरोधक कठीण करतात.    शुभ दिनांक ः 15, 20

कर्क ः आत्मविश्वास वाढेल

स्वराशीत सूर्यप्रवेश, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायातील समस्या सोडवताना अनुभवी, जुन्या लोकांना डावलू नका. नोकरीत चांगला बदल कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वास वाढेल. जवळच्या लोकांना समजून घ्या. स्पर्धेत टिकून राहाल. कोर्ट केस संपवण्याची तयारी ठेवा. शुभ दिनांक ः 14, 18

सिंह ः मतभेद होतील

सिंह राशीच्या व्ययेशात सूर्यप्रवेश, शुक्र-शनी प्रतियुती होत आहे. गोड बोलून तुमचे डावपेच काढून घेतले जातील. अडचण वाढेल. कोर्ट केस होऊ शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत टीकात्मक बोलणे ऐकावे लागेल. नम्रपणे सर्व कार्य करत राहा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत मतभेद होतील. शुभ दिनांक ः 15, 20

कन्या ः शेअर्सचा अंदाज येईल

कन्या राशीच्या एकादशात सूर्यप्रवेश, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात जम बसेल. मोठे कंत्राट मिळेल. निर्णय निश्चित करा. आर्थिक गुंतवणूक योग्य ठिकाणी करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत  नवी सुरुवात करा. प्रगतीचा योग्य मार्ग निवडता येईल.  शुभ दिनांक ः 14, 15

तूळ ः परदेश गमनाचा योग

तुळेच्या दशमेशात सूर्यप्रवेश, शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला उत्साहाचा व यशाचा राहील. व्यवसायात, नोकरीत जम बसवा. शेअर्समध्ये लाभ मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत योग्य कार्यपद्धतीचा उपयोग करा. यशाचा झेंडा फडकवता येईल. परदेशात जाण्याचा योग येईल.    शुभ दिनांक ः 14, 15

वृश्चिक ः आर्थिक व्यवहारात लाभ

वृश्चिकेच्या भाग्येशात सूर्यप्रवेश, शुक्र-शनी प्रतियुती होत आहे. स्वतःचे एखादे गुपित कुणीतरी उघड करण्याचा प्रयत्न करील. व्यवसायात थांबू नका. मेहनतीला चांगले यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत त्रुटी भरून काढता येतील. घर, दुकान खरेदी-विक्रीत फायदा होईल.  शुभ दिनांक ः 15, 18

धनु ः प्रतिष्ठा जपा

धनु राशीच्या अष्टमेशात सूर्यप्रवेश, शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. व्यवसायातील व्यवहारात सावध रहा. प्रतिष्ठा जपा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विचारपूर्वक वक्तव्य करा. स्पर्धा महत्त्वाची ठरेल. नोकरीत निर्णय घेताना घाई करू नका. शुभ दिनांक ः 19, 20

मकर ः कार्याला गती मिळेल

मकरेच्या सप्तमेशात सूर्यप्रवेश, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. चंद्रग्रहणानंतर तुमच्या प्रत्येक कार्याला गती मिळेल. व्यवसायातील चुकलेला निर्णय सुधारता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वेगाने कार्यास आरंभ करा. वेळ कमी व कामे जास्त आहेत. योग्य कार्याची आखणी करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.  शुभ दिनांक ः14, 20

कुंभ ः वादविवादांपासून दूर राहा

कुंभेच्या षष्ठय़स्थानात सूर्यप्रवेश, शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत समस्या येईल. तुमचा विचार पटणे कठीण होईल. वादविवाद वाढू शकतो. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोधाचा सामना तुम्हाला करावा लागेल. प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक ः 14, 15

मीन ः सकारात्मक घटनांचा काळ

मीनेच्या पंचमेशात सूर्यप्रवेश, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. योग्य गुंतवणूक करा. नोकरीत जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. योजनांना गती मिळेल. नवीन परिचय होतील.  शुभ दिनांक ः 14, 15