>> नीलिमा प्रधान
कामाचा व्याप वाढेल
मेष
मेषेच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार-सोमवार कामात अडचणी येतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कठीण प्रश्नावर मार्ग शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगाने प्रगती कराल. कार्याचा विस्तार होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करा.
शुभ दिनांक ः 17, 18
अहंकार दूर ठेवा
वृषभ
वृषभेच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. अहंकार ठेवू नका. व्यवसायात स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करा. कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढेल. आरोप होतील, मात्र कोणतेही मुद्दे मांडताना कायदा पाळा.
शुभ दिनांक : 13, 17
निर्णयात तारतम्य बाळगा
मिथुन
मिथुनेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. भावनेच्या आहारी न जाता तुमच्या क्षेत्रात, नोकरी, धंद्यात निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारतम्य ठेवून बोला. कायद्याला कमी लेखू नका. जवळच्या व्यक्तीशी मतभेद होतील. मान, प्रतिष्ठा टिकवण्यासाठी योग्य वर्तन ठेवा.
शुभ दिनांक : 14, 15
तुमचे महत्त्व कमी होईल
कर्क
कर्केच्या षष्ठमाषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवड्यात महत्त्वाची कामे करण्यासाठी मेहनत घ्या. चौफेर सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच सर्वांच्या लक्षात आल्याने तुमचे महत्त्व कमी होईल. सहनशीलता बाळगा. कोर्टकेसमध्ये तडजोड करावी लागेल.
शुभ दिनांक : 12, 13
तणाव येईल
सिंह
सिंहेच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक, मानसिक तणाव येईल. धावपळ करावी लागेल. अनाठाई गुंतवणूक करण्याची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रश्नांवर चर्चा करून तोडगा शोधता येईल. कोर्टकेस संपवा.
शुभ दिनांकः 17, 18
कामाचा व्याप वाढेल
कन्या
कन्येच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील प्रश्न तटस्थपणे सोडवा. प्रक्षोभक वक्तव्य करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचा व्याप वाढेल. विरोधकांच्या डावपेचावर लक्ष ठेवून विधान करा. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष नको. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 12, 13
महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
तूळ
तुळेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तणावाकडे दुर्लक्ष करून महत्त्वाच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष द्या. नोकरीधंद्यात प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक आव्हाने स्वीकारावी लागतील. विचारांना चालना देणारे प्रसंग येतील. कला-साहित्यात चमकाल.
शुभ दिनांक : 14, 15
रागावर ताबा ठेवा
वृश्चिक
वृश्चिकेच्या धनेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. अनेक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. रागावर ताबा ठेवा. नोकरीधंद्यातील समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांच्या सहमतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद ठरेल. स्वत:ची प्रतिमा टिकवा.
शुभ दिनांक : 17, 18
प्रश्न मार्गी लागतील
धनु
स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. कोणताही निर्णय घेताना संयम बाळगा. तुमचे प्रश्न मार्गी लावता येतील. धंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाषण कराल. लोकप्रियता वाढेल. कायद्याच्या कक्षा ओळखून कोर्टाच्या कामात बुद्धी वापरा. कुटुंबात चांगल्या घटना घडतील.
शुभ दिनांक : 14, 15
अतिशयोक्ती नको
मकर
मकरेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह राहील. नोकरी, धंद्यात तारेवरची कसरत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही विधान वा करार करताना अतिशयोक्ती नको. कोणताही प्रश्न सोडवणे कठीण असले तरी अशक्य नसते हे लक्षात ठेवा.
शुभ दिनांक ः 12, 13
प्रभावी कार्य कराल
कुंभ
कुंभेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो तुम्ही आघाडीवर राहाल. नोकरीधंद्यातील समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य कराल. सहकाऱयांना गृहीत धरू नका. कुटुंबात क्षुल्लक वाद वाढवू नका. नवीन ओळख पारखून मगच व्यवहार करा.
शुभ दिनांक : 13, 14
प्रत्येक दिवस यशस्वी
मीन
मीनेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवस यशस्वी ठरेल. नोकरीधंद्यात अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत:च्या कामावर, योजनेवर नीट लक्ष द्या. वेळेला महत्त्व द्या. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. कला-क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
शुभ दिनांक : 14, 15























































