साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 12 ते शनिवार 18 मार्च 2023

>> नीलिमा प्रधान

मेष: फसगत टाळा
स्वराशीत शुक्र, पराक्रमात मंगळ, व्ययेषात सूर्य, बुध. आठवडा कसोटीचा, फसगत टाळण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तणाव, व्याप राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, प्रत्यारोप होतील. तुमचे डावपेच यशस्वी ठरणार नाहीत. नविन परिचयाने आत्मविश्वासात भर पडेल. कायदा मोडू नका. 
 शुभ दिनांकः 12, 18

वृषभ: सावध रहा
व्ययेषात शुक्र, धनेषात मंगळ, एकादशात सूर्य, बुध. भावनेच्या भरात कसेही वागू नका. सावध रहा. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात चर्चा यशस्वी ठरेल. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दय़ाला धरून प्रभावी भाषण कराल. पद मिळेल. वरीष्ठांना खूष कराल. जवळच्या व्यक्ती डावपेच खेळतील.
शुभ दिनांक : 13, 14

मिथुन: रागावर ताबा ठेवा
एकादशात शुक्र, स्वराशीत मंगळ, दशमेषात सूर्य, बुध. रागावर ताबा ठेवल्यास कोणतेही काम यशस्वी कराल. प्रवासात धोका स्वीकारू नका. नोकरीत कामाचे काwतुक होईल. उत्तम संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होईल. लोकसंग्रह वाढेल. स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दिनांक : 12, 16

कर्क: प्रेरणादायक घटना घडेल
कर्केच्या दशमात शुक्र, व्ययेषात मंगळ, भाग्येषात सूर्य, बुध. सप्ताहाच्या शेवटी प्रेरणादायक घटना घडेल. तुमच्यावर विरोधकांचा दबाव राहील. नोकरीत तारेवरची कसरत होईल. धंद्यात नम्र रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यावर भर द्या. मानसन्मान लाभेल पण थोडी तडजोड करा.
शुभ दिनांक : 13, 18

सिंह: सावधपणे निर्णय घ्या
सिंहेच्या भाग्येषात शुक्र, एकादशात मंगळ, अष्टमेषात सूर्य, बुध. तुमच्या क्षेत्रात अतिसावधपणे निर्णय घ्या. कायदा पाळा. नोकरी टिकवा. धंद्यात तणाव, वाद जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची  दिशाभूल होईल. मुद्दे कुमकुवत ठरतील. नविन परिचय होतील. दगदग होईल.
शुभ दिनांक : 12, 16

कन्या: कामाकडे लक्ष द्या
कन्येच्या अष्टमेषात शुक्र, दशमेषात मंगळ, सप्तमेषात सूर्य, बुध. स्वतŠच्या कामावर लक्ष पेंद्रित करा. यश लाभेल. नोकरी टिकवा. धंद्यात हिशेब नीट  करा. भावना, मोह आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांकडून आश्वासन मिळेल. कोणतेही वक्तव्य जपून करा. अरेरावी नको. संसारात खर्च होईल.
शुभ दिनांक : 13, 18

तूळ: तडजोडीची तयार ठेवा
तुळेच्या सप्तमेषात शुक्र, भाग्येषात मंगळ, षष्ठsषात सूर्य, बुध. क्षेत्र कोणतेही असो नम्रता असू द्या. तडजोड करण्याची तयारी ठेवा. धंद्यात उतावळेपणा नको. नोकरीच्या कामात चूक नको. वरिष्ठांचे मत ऐका. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याच्या कक्षेत राहून बोला.
शुभ दिनांक : 12, 13

वृश्चिक: कठोर वक्तव्य टाळा
वृश्चिकेच्या षष्ठsशात शुक्र, अष्टमेषात मंगळ, पंचमेषात सूर्य, बुध. नविन परिचयावर भाळू नका. कठोर वक्तव्य टाळा. तुमच्या कार्याला वेगाने पुढे न्या. नोकरीधंद्यात समतोल राखा. मोह, राग आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात करार करताना भावनिक मुद्दे दूर ठेवा. अधिकार मिळतील.
शुभ दिनांकः 17, 18

धनु: प्रकृतीची काळजी घ्या
धनुच्या पंचमेषात शुक्र, सप्तमात मंगळ, सुखस्थानात सूर्य, बुध. आठवडय़ाच्या सुरूवातीला मनावर दडपण राहील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत समतोल राखा. धंद्यात सावध रहा. राग आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठांच्या मुद्दय़ाला विरोध नको.
शुभ दिनांक : 17, 18 

मकर: तडजोड करावी लागेल
मकरेच्या सुखस्थानात शुक्र, षष्ठsषात मंगळ, पराक्रमात सूर्य, बुध. अविरत परिश्रमाने इतरांना थक्क करा. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात गोड बोला. नव्या संधीचा शोध घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. विरोधकांना उत्तर न देता ध्येयावर लक्ष ठेवा. कुटुंबात दगदग होईल.
शुभ दिनांक : 13, 18

कुंभ: क्षुल्लक वाद होतील
कुंभेच्या पराक्रमात शुक्र, पंचमेषात मंगळ, धनेषात सूर्य, बुध. मित्रांसोबत क्षुल्लक वाद होतील. नोकरीत प्रगती होईल. आठवडय़ाच्या शेवटी प्रसंगावधान राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक योजना पूर्ण कराल. भेट, चर्चा यात यश मिळेल. नवे डावपेच तयार कराल. स्पर्धेत सावध रहा.
शुभ दिनांक : 13, 16

मीन: कामांना गती मिळेल
मीनेच्या धनेषात शुक्र, सुखस्थानात मंगळ, स्वराशीत सूर्य, बुध. सप्ताहाच्या शेवटी अनेक कामांना गती मिळेल. प्रकृती सुधारेल. नोकरीत उतावळेपणा नको. धंद्यात वाढ होईल. नविन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. संधीची वाट पहा. अहंकार दूर ठेवा.
शुभ दिनांक : 17, 18