>> नीलिमा प्रधान
मेष – कार्याला गती मिळेल
मेषेच्या सप्तमेषात सूर्य, मंगळाचे राश्यांतर होत आहे. कोजागरी पौर्णिमेनंतर तुमच्या कार्याला गती मिळेल. व्यवसायात तडजोडीचे धारेण ठेवा. तुमच्या बुद्धिमतेचा उपयोग करून घेतला जाईल, मात्र लाभ मिळणार नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणींवर मात करा. खर्च वाढेल.
शुभ दिनांक – 21, 22
वृषभ- वाद वाढवू नका
वृषभाच्या षष्ठेशात रवी, मंगळ राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. व्यवसायात गुंतवणुकीबाबत मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रगतीचा आलेख विरोधकांना सहन होणार नाही. क्षुल्लक वाद वाढवू नका.
शुभ दिनांक – 18, 19
मिथुन – रागावर ताबा ठेवा
मिथुनेच्या पंचमेषात सूर्य, मंगळाचे राश्यांतर होत आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जाल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. कोणताही अतिरेक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य सल्ला घ्या. कामात तत्परता ठेवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांना खूश कराल. कुटुंबात क्षुल्लक नाराजी होईल.
शुभ दिनांक – 17, 18
कर्क – शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर
कर्पेच्या सुखस्थानात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. वाद वाढवू नका. मनावर दडपण येईल. व्यवसायात जम बसेल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण योजना राबविता येतील. कोणतेही किचकट काम रेंगाळत ठेवू नका. शेअर्समध्ये फायदेशीर गुंतवणूक करता येईल.
शुभ दिनांक – 18, 19
सिंह – व्यवसायाला कलाटणी मिळेल
सिंहेच्या पराक्रमात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. आत्मविश्वास वाढेल. दगदग वाढेल. व्यवसायाला कलाटणी देण्याची संधी मिळेल. गुंतवणूकीची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रयत्न करा. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या.
शुभ दिनांक – 17, 22
कन्या – कामाची नवी प्रेरणा मिळेल
कन्या राशीच्या धनेषात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठेचे पारडे जड होईल. जनहिताच्या कामात यश मिळेल. थोरामोठय़ांचा सहवास मिळेल. कामाची नवी प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक – 18, 19
तूळ – वादग्रस्त वक्तव्य टाळा
स्वराशीत सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संयमाने बोला. व्यवसायात तडजोड करावी लागेल. कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्याचे टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात डावपेच खेळले जातील. रागावर ताबा ठेवा. प्रगतीची संधी हुकण्याची शक्यता.
शुभ दिनांक – 21, 22
वृश्चिक – संमिश्र स्वरूपाचा कालावधी
वृश्चिकेच्या व्ययेषात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, चौफेर सावध राहा. विरोधक फायदा घेतील. व्यवसायात लाभदायक संधी मिळेल. गुंतवणूक फायदेशीर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. कला, साहित्यात लक्ष लागणार नाही.
शुभ दिनांक – 18, 19
धनु – चर्चा यशस्वी होतील
धनुच्या एकादशात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. आत्मविश्वासाच्या बळावर यश खेचून आणता येईल. व्यवसायात चर्चा यशस्वी होतील. नोकरीच्या कामात इतरांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. नवीन परिचयाबाबत सावध रहा. स्पर्धेत यश मिळवाल.
शुभ दिनांक – 17, 20
मकर – सकारात्मक काळ
मकर राशीच्या दशमेषात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. उद्योग धंद्यात स्थिरता आणता येईल. क्षुल्लक तणाव दूर करून नव्या उमेदीने प्रगती करू शकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाची दिशा निश्चित करा. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. कला, साहित्यात यश मिळेल.
शुभ दिनांक – 17, 18
कुंभ – प्रेरणादायी घटना घडेल
कुंभेच्या भाग्यस्थानात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. तुमच्या आत्मविश्वासात भर पाडणारी प्रेरणादायी घटना घडेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात, दौऱयात प्रभावी ठराल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. कला, साहित्यात चमकाल.
शुभ दिनांक – 21, 22
मीन – प्रसिद्धीचा हव्यास दूर ठेवा
मीनेच्या अष्टमेषात सूर्य, मंगळ राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला कठीण कामे करून घ्या. कोणताही अतिरेक नको. संयम, सहनशीलता व काम यात सातत्य ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धीचा हव्यास नको. कुटुंबात चांगली घटना घडेल. कला, साहित्यात यश मिळेल.
शुभ दिनांक – 21, 23
























































