साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 ऑगस्ट ते शनिवार 26 ऑगस्ट 2023

मेष

चर्चा यशस्वी होईल

सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ नेपच्युन प्रतियुती वर्चस्व राहील परंतु काही व्यक्तींमुळे तणाव होईल. नोकरीत फायदेशीर बदल शक्य. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळची माणसे दुरावल्यासारखी वागतील. मानसन्मान वाढेल. डावपेच ठरवता येतील. यश मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 22, 23

वृषभ

अडचणींवर मात कराल

चंद्र, शुक्र लाभयोग, मंगळ, प्लुटो त्रिकोणयोग. क्षुल्लक अडचणींवर मात करून यश खेचावे लागेल. उत्साह वाढेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात चांगला प्रतिसाद लाभेल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा बाऊ न करता लोकप्रियता वाढवा. योजना पूर्ण करा. कायद्याच्या कक्षेत रहा.

शुभ दिनांक: 20, 24

मिथुन

रागावर ताबा ठेवा

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. नविन परिचयाचा लाभ मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अडचणी सोडवाल. स्पर्धेत आघाडीवर राहाल. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल.

 शुभ दिनांक: 21, 22

कर्क

महत्त्वाची कामे करा

मंगळ, नेपच्युन प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग. उत्साह वाढवणाऱया घटना घडतील. महत्त्वाची किचकट कामे कराल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात नवे कंत्राट मिळेल.  राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तुमच्या कार्याचा बोलबाला वाढेल. कामाचे नियोजन करा. लोकप्रियता वाढेल. कला, साहित्यात चमकाल.

शुभ दिनांक : 20, 21

सिंह

आरोग्याची काळजी घ्या

चंद्र, गुरू प्रतियुती, सूर्य, प्लुटो षडाष्टक योग. जवळच्या व्यक्ती अपयशाला कारणीभूत ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. धंद्यात फसगत टाळा. नोकरीत सावधपणे काम करा. वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता टिकवून ठेवाल. प्रतिष्ठा राखा. कुटुंबात कठोर बोलणे टाळा.

शुभ दिनांक : 21, 22

कन्या

मानसिक समतोल राखा 

चंद्र, शुक्र लाभयोग़  मंगळ, प्लुटो  त्रिकोणयोग. मानसिक समतोल राखता येईल. अतिशयोक्ती, अहंकार दूर ठेवून वक्तव्य करा. कायदा मोडू नका. प्रवासात सावध रहा. नोकरी टिकवा. धंद्यात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. अनुचित बोलणे टाळा. यश खेचता येईल. स्पर्धा दूर ठेवा.

शुभ दिनांक : 22, 23

तूळ

कामाचे कौतुक होईल 

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. रागावर नियंत्रण ठेवा. दुखापत टाळा. नोकरीधंद्यात उत्तम प्रगती. थकबाकी वसूल करा. जुना व्यवहार संपवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. अधिकारात वाढ होईल. डावपेचात बाजी माराल. यश मिळेल.

शुभ दिनांक : 24, 26

वृश्चिक

कठीण कामे पूर्ण करा 

मंगळ, नेपच्युन प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग. प्रसंगावधान, बुद्धिचातुर्य ठेवल्यास कठीण कामे पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता मिळेल. नव्या ओळखी ऊर्जा देतील. कोणालाही कमी लेखू नका.

शुभ दिनांक : 20, 24

धनु

अनाठायी खर्च होईल 

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग. जवळच्या व्यक्ती मनस्ताप देतील. संयम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीधंद्यात लाभ होईल. मोह टाळा. नवीन परिचयापासून सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. मैत्रीत गैरसमज होतील. अनाठायी खर्च टाळा.  कामे करा.

शुभ दिनांक : 20, 22

मकर

प्रवासात सावध रहा

सूर्य, प्लुटो षडाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. प्रवासात सावध रहा. तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता. नोकरीत नम्रपणे बोला. कामात चूक टाळा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट प्रश्न मार्गी लागेल. प्रतिष्ठा जपा. कायदा पाळून वक्तव्य करा. अहंकाराने नुकसान होईल.

शुभ दिनांक : 21, 24

कुंभ

फसगत टाळा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. प्रवासात, खाण्यापिण्यात सावध रहा. फसगत टाळा. नोकरीत वर्चस्व राहील. पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील. लोकप्रियता कमी करतील. तरीही प्रतिष्ठा जपता येईल. प्रसंगावधान राखा.

शुभ दिनांक : 22, 23

मीन

अतिशयोक्ती नको

सूर्य, नेपच्यून षडाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य टाळा. घातक ठरेल. प्रेमाने बोला तरच यश मिळेल. नोकरीत सावध रहा. धंद्यात कमी बोला. स्पर्धेत जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात रागावर, अहंकारावर नियंत्रण ठेवा. अपयशाने न खचता लोकांची कामे करा. सहकारी व वरिष्ठांना जपा.

शुभ दिनांक :20,24