Weight Loss Tips – झटपट बारीक होण्यासाठी ‘या’ उपायांचा अवलंब करा, वाचा

बारीक होण्यासाठी केवळ व्यायाम करुन भागणार नाही. तर बारीक होण्यासाठी आपल्याला आहाराकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामध्ये उत्तम शिस्त बाळगल्यास, आपल्याला बारीक होण्यासाठी मदत होते. बारीक होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची खबरदारी घेणे हे गरजेचे आहे. म्हणूनच आहाराच्या जोडीला व्यायाम केल्यास पटकन बारीक होण्यास मदत होते.

बारीक होण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे, डाएट करणे शरीराला घातक ठरू शकते. यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा नंतर अचानक खूप वाढलेले वजन असे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

दर दोन तीन तासांनी एखादे फळ, ताक किंवा सूप किंवा अगदीच कामात असाल तर मल्टिग्रेन बिस्किट्स नक्की खा.

सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यात सर्व पोषकतत्व जाणे गरजेचे आहे. त्यामुळे यावेळी चौरस आहार घ्या.

ज्यात कार्बोहायड्रेट आणि फायबरसाठी धान्यापासून बनलेले काहीतरी जसे पोहे, रवा, भाकरी, चपाती,कॉर्नफ्लेक्स, व्हीटफ्लेक्स इ.

रोज सकाळी उठून सर्वप्रथम एक फळ किंवा एक मोठी वाटी पपई घ्यावी. तसेच लिंबू, मीठ ,चिमूटभर दालचिनी पूड घालून कोमट पाणी घ्यावे. ह्यामुळे शरीराला डिटॉक्सिफिकेशन आणि क्लेनझिंग व्हायला मदत होते.

व्यायामाला कमीत कमी 1 ते 2 तास रोज देणे जरुरीचे आहे. चालणे,पोहणे,सूर्यनमस्कार घालणे इ. प्रकार बारीक होण्यासाठी फार उपयोगी ठरतात.

Juice Benefits – ‘हा’ ज्यूस आहे अनेक रोगांवर गुणकारी, वाचा

व्यायामाप्रमाणेच पोषक अन्न देखील महत्वाचे असते. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य कॉम्बिनेशनचे अन्नघटक शरीरात जाणे महत्वाचे आहे.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)