कमालच! ‘गुगल मीट’वर लग्न; ‘झोमॅटो’वरून पाहुण्यांना जेवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे सण-समारंभ, लग्नसोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱयांकर कारवाई होत आहे. अशातच पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने यातून हटके मार्ग काढला आहे. संदीपन सरकार आणि अदिती दास यांचा लग्नसोहळा 24 जानेवारीला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 200 जणांना परवानगी असली तरी लग्नात गर्दी होऊ नये आणि कोरोना संकटात कुणाचाही जीव धोक्यात घालू नये यासाठी या जोडप्याने अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी लग्न आणि मेजवानीसाठी 450 जणांना आमंत्रित केले आहे. मात्र, हे पाहूणे ऑनलाईन हजेरी लाकत या नकदाम्पत्याला आशीर्काद देतील. लग्नात सहभागी होण्यासाठी त्यांना गुगल लिंक पाठवली जाईल. एकढच नव्हे तर लग्नानंतर पाहूण्यांच्या घरी मेजवानी पोहोचकण्यासाठी झोमॅटोची मदत घेतली आहे. त्यांच्या या हटके लग्नसोहळ्यामुळे नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि आमंत्रण न दिल्यामुळे पाहूण्यांना देखील राग येणार नाही.