पश्चिम बंगालमध्ये संघाच्या कार्यकर्त्याची व 8 महिन्याच्या गरोदर पत्नीची हत्या

1470

लोकसभा निवडणूकीच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजप, संघाचे कार्यकर्त्यांमध्ये बराच हिंसाचार झाला. त्यात अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या देखील झाल्या. लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले असतानाही अद्याप पश्चिम बंगालमधला हिंसाचार थांबलेला नाही.

पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची, त्याच्या गरोदर पत्नीची व आठ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्या तिघांचेही धारदार सुऱ्याने गळे चिरण्यात आले आहेत. बोंधू गोपाल पाल (35) असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून ते शाळेत शिक्षक होते. बोंधू गोपाल यांची पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती. त्या तिघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात सापडले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अत्यंत धक्कादायक आहेत.

पश्चिम बंगालचे स्वयंसेवक संघाचे सचिव जिश्नू बासू यांनी या हत्येचा निषेध करत मारेकऱ्यांनी लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील या हत्येचा निषेध केला आहे. ‘या हत्येचा व्हिडीओ पाहून मी हादरून गेलो आहे. संघाचा कार्यकर्ता, त्याची आठ महिन्याची गरोदर पत्नी व मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र या हत्येबाबत पुरोगाम्यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. 59 पुरोगाम्यांनी ममता बॅनर्जींला पत्र लिहले नाही. हे फार वाईट आहे’, असे ट्विट पात्रा यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या