
गेली सहा महिने बंद असलेली थिएटर पश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. राज्यात नृत्य, गायनाचे कार्यक्रम तसेच जादूचे प्रयोग सुरू करण्यासही त्यांनी परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रेक्षकसंख्या 50 टक्के असणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘जनजीवन पूर्वकत होण्यासाठी थिएटर, जत्रा, नाटक, जादूचे प्रयोग, संगीत आणि नृत्य गायनाचे कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. ही परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.



























































