
वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) मार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलिने विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाहाकार होत आहे. गावकऱ्यांनीच विद्युत भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत करावा असा अजब फतवा वेकालीने काढल्याने गावकऱ्या समोर चिंतेचा विषय बनला आहे.
शनिवारी गावकऱ्यांनी वेकोली प्रबंधक एस. के. भैरवा यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. माजरी एरियातील कुनाडा गावाचे 2006 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु या गावाच्या अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्वसन समिती नेमण्यात आली. त्यानंतर वेकोलिने गावाला दत्तक घेतले व 2010 रोजी गावाचे पुनर्वसन झाले. आता अकरा वर्षांचा काळ लोटत असला तरी वेकोलीने अजून पावेतो पुनर्वसन झालेल्या गावातील पट्टे सुद्धा गावकऱ्यांच्या नावावर केले नाहीत.
आतापर्यंत वेकोलि मार्फत गावांमध्ये सोयीसुविधा व्यवस्थित चालू असताना वेकोलिचे प्रबंधक यांनी ग्रामपंचायत सचिवाला पत्रव्यवहार करून विद्युत पुरवठा खंडित करून येतील पाणी बंद करणार असल्याच्या सूचना केल्या होत्या. यावर काही नागरिकांनी प्रबंधक यांची भेट घेऊन चर्चा केली असता प्रबंधकानी गावाला पाणी पाहिजे असेल तर येणाऱ्या विद्युत बिलाचा भरणा करा असा अजब फतवा काढल्याने येथील गावकरी हतबल झाले आहे.
गावकरी पहाटे 9 वाजल्यापासून वेकोली प्रबंधकाच्या बंगल्या समोर ठिय्या आंदोलन करून विद्युत पूरवठा पूर्ववत चालू करून पानी पूरवठा चालू ठेवा याकरता आंदोलन केले. ही समस्या प्रबंधकाने महाप्रबंधक कुसना यांच्या असल्याचे सांगून प्रकरण झटकण्याचा प्रयत्न केल्याने वेकोलिने दत्तक घेतलेल्या गावातील पाण्याची समस्या कोण सोडवणार, असा प्रश्न गावकऱ्यांना समोर पडला आहे.

























































