उद्यापासून पश्चिम रेल्वेवर दहा एसी फेऱ्यांस 194 नव्या लोकल फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने येत्या गुरुवार 15 ऑक्टोबरपासून दहा वातानुकूलित लोकल फेऱयांसह एकूण 194 अतिरिक्त फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी चालविण्यात येणाऱया एकूण फेऱयांची संख्या 506 वरुन 700 इतकी होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवासात ’सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी मदत होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या वाढविण्यात आलेल्या 194 फेऱयांमध्ये सकाळच्या गर्दीतील 49 आणि संध्याकाळच्या गर्दीतील 49 फेऱयांचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी म्हटले आहे. वाढविलेल्या 194 फेऱयांमध्ये 10 वातानुकूलित लोकल फेऱयांचा समावेश आहे त्यात दोन एसी लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार एक फेरी डाऊन दिशेला महालक्ष्मी ते बोरीवली तर एक अप दिशेला बोरीवली ते चर्चगेट अशी चालविण्यात येईल, तर एसी लोकलच्या आठ फेरी जलद मार्गावर होणार असून चार डाऊन दिशेला चर्चगेट ते विरार तर चार अप दिशेला विरार ते चर्चगेट अशा चालविण्यात येणार आहेत. 23 मार्चनंतर कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली लोकल सेवा 15 जूनपासून राज्य सरकारच्या मागणीवरून अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. 28 सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या फेऱया 500 वरुन 506 करण्यात आली होती. त्यात सहा फेऱया महिलांसाठी वाढविण्यात आली आहे.

149 नव्या फेऱयांचा तपशील

15 गुरुवार पासून वाढविलेल्या 149 फेऱयांमध्ये 51 फेऱया चर्चगेट ते विरार सेक्टरमध्ये, 96 फेऱया बोरीवली ते चर्चगेट सेक्टरमध्ये, 9 फेऱया भाईंदर ते विरार, 12 फेऱया नालासोपारा ते चर्चगेट, 9 फेऱया चर्चगेट ते भाईंदर, 2 फेऱया वसई ते चर्चगेट, 8 फेऱया वांद्रे ते बोरीवली, 8 फेऱया चर्चगेट ते भाईंदर दरम्यान वाढवल्या.