पश्चिम रेल्वेच्या 75 स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प, वर्षाला तीन कोटींची वीज बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या 75 रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यात प्रत्येक स्थानकावंर किंवा रेल्वे इमारतीच्या छतावर 8.67  मेगावॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर प्लांट बसविण्यात आले असून त्याद्वारे या सोलार प्रकल्पांना ग्रीडशी जोडण्यात आले असून त्यामुळे वार्षिक तीन कोटी रूपयांची वीज बचत शक्य झाली आहे. रेल्वेने 2030 पर्यंत झीरो कार्बन उत्सर्जनाचे ध्येय राखले आहे. या मोहिमेत सर्व रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याची योजना आहे. त्याबरोबरच ऊर्जेचे अपारंपारिक स्रोत वापरले जात आहेत. पश्चिम रेल्वेने मुंबई डिव्हीजनच्या 22 रेल्वे स्थानकांत रूफ टॉप सोलार प्लांट बसविण्याची योजना आखली आहे. त्यात चर्चगेट,  ग्रँट रोड, माटुंगा रोड, अंधेरी, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, माहिम, खार रोड, सांताक्रुज, राम मंदिर रोड, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, कसई, नालासोपारा, डहाणू रोड तसेच दादर आणि कांद्रे टर्मिनसकर सोलार प्लांट स्थापन करण्यात आले आहेत. रतलाम डिव्हीजनच्या 34, वडोदरा डिव्हीजनच्या सहा आणि राजकोट डिव्हीजनच्या 8 स्थानकांवर सोलार प्लांट बसविण्यात आले आहेत.

51 हजार हेक्टरवर सोलार प्रकल्प

रेल्वेकडे 51 हजार हेक्टर जमिन उपलब्ध असून त्यावर विकासकांद्वारे सोलार पॉवर प्लांट बसवून 2030पर्यंत 20 गिगावॅट वीजेच्या निर्मितीचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे.