असं झालं तर… व्हॉट्सऍप कॉलवर लोकेशन ट्रक होत असेल तर

व्हॉट्सऍप कॉलच्या तुमचे लोकेशन ट्रक केले जाऊ शकते. याचा हॅकर्स गैरफायदा घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

तुमचे लोकेशन ट्रक होऊ नये यासाठी व्हॉट्सऍपमध्ये एक सेटिंग आहे. प्रोटेक्ट आयपी ऍड्रेस इन कॉल ही सेटिंग यासाठी महत्त्वाची आहे.

व्हॉट्सऍपमध्ये ही सेटिंग बाय डिफॉल्ट बंद असते. मात्र, व्हॉट्सऍपच्या सुरक्षेसाठी ही सेटिंग ऑन करणे आवश्यक आहे

व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला प्रायव्हसीचा एक पर्याय दिसेल. तिथे गेल्यावर ऍडव्हान्स हा पर्याय निवडा.

येथे प्रोटेक्ट आयपी ऍड्रेस हे फिचर दिसेल. ही सेटिंग ऑन करा. यामुळे तुमचे व्हॉट्स ऍप कॉल्स हे कंपनीच्या सर्व्हरच्या माध्यमातून जातील आणि तुमचे ऍप सुरक्षित असेल.