जाणून घ्या ‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणजे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदुस्थान अंतराळ महाशक्ती झाल्याचे जाहीर केलं. त्यात त्यांनी हिंदुस्थानच्या ए सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राने एक उपग्रह नष्ट केल्याचं म्हटलं. हे मिशन शक्ती जिथे पार पडलं त्या लो अर्थ ऑर्बिटचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. पण, तुम्हाला माहीत आहे का, लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय?

लो अर्थ ऑर्बिट ही एक अंतराळविज्ञानातली संज्ञा आहे. ऑर्बिट या शब्दाचा अर्थ होतो कक्षा. पृथ्वीपासून ते अवकाशापर्यंतच्या अंतराचे विविध टप्पे असतात. त्या टप्प्यांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार संज्ञा दिली जाते. लो अर्थ ऑर्बिट ही त्यातीलच एक संज्ञा आहे. ही कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळची कक्षा म्हणून ओळखली जाते. ही कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते अवकाशात 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटरपर्यंत पसरलेली असते. या अंतराळ परिक्षेत्राचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असल्यामुळे इथे कनेक्शन सगळ्यात चांगलं मिळतं. त्यामुळे बहुतांश उपग्रह याच ठिकाणी असतात. या कक्षेत असलेल्या उपग्रहांना पृथ्वीवरच्या हालचाली सुस्पष्टपणे टिपता येतात. म्हणूनच या कक्षेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते.

लो ऑर्बिट व्यतिरिक्त मीडियन अर्थ ऑर्बिट, जियोसिन्क्रोनस ऑर्बिट आणि त्यानंतर असलेली हाय अर्थ ऑर्बिट असे या कक्षांचे प्रकार आहत. हाय अर्थ ऑर्बिट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,786 किलोमीटरवर आहे.