
- कृष्णाला पारिजातकाचे फुल सर्वात आवडते.
- राधेने दिलेली वैजयंतीमाला अर्थात तुळशीची माळ त्याला परम प्रिय आहे.
- त्याचा आवडता प्राणी घोडा, कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. त्यांची नावे त्याने त्यांच्या वैशिष्ठ्यानुसार, शैव्य, सुग्रीव, बलाहक, आणि मेघपुष्प ठेवली होती.
- कृष्ण उत्तम सारथी होता.
- त्याचे गोधन त्याच्या अत्यंत हृदयाजवळ होते.
- शंखासुर नावाच्या दैत्याचा जेव्हा त्याने वध केला तेव्हा त्याला अतिशय सुंदर शंख सापडला. तो त्याने त्याचे गुरु सांदिपनी ऋषींना आणून दिला. आचार्यांनी शंखाचे नाव पांचजन्य ठेवून तो कृष्णाला परत दिला.
- शंखाबरोबरच आचार्यांनी त्याला अतितांजय नावाचे धनुष्य दिले.
- याशिवाय कृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील कमलेश्वर शिवमंदिरात तप करून मिळवले होते. श्रीविष्णूनी ते त्यांच्या कृष्ण अवतारात धारण केले.
- कृष्णाला त्याची पहिली मुरली राधेने दिली होती.
- श्रीकृष्णाला एकूण ८० मुले होती.
- कृष्णाचे एकूण आयुष्य १०८ वर्षांचे होते.
- मार्गशीर्षातील शुक्ल एकादशीला कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. निष्काम कर्मयोग हे त्याचे तत्वज्ञान आहे.
- कृष्णाचे महानिर्वाण इसविसन पूर्व ५५२५ साली झाले आहे.
























































