
1 मुंबईसारख्या शहरात पार्किंगची मोठी समस्या उद्भवते. मार्केटमध्ये गेल्यानंतर अनेक ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभी केल्यास टोइंग व्हॅन गाडी उचलून घेऊन जातात.
2 जर तुमची दुचाकी किंवा चारचाकी गाडी टोइंग व्हॅनने उचलून नेल्यास सर्वात आधी वाहतूक विभागाला संपर्क साधा आणि तुमच्या दुचाकीची टोइंग प्रक्रिया झाली आहे की नाही पाहा.
3 दुचाकी घेऊन गेल्यानंतर टोइंगची नोंद झाली आहे की नाही, हे तपासा. काही वेळा चुकीच्या पद्धतीने दुचाकी टो केली जाते, त्यामुळे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
4 टोइंग व्हॅनने दुचाकी उचलल्याची घटना चुकीची आणि धोकादायक आहे. टोइंग व्हॅनने सुरक्षितपणे दुचाकी उचलली आहे आणि वाहनांचे कोणतेही नुकसान झाले नाही याची खात्री करा.
5 टोइंग व्हॅन चालकाने नियमांचे उल्लंघन केले आहे की नाही हे तपासा. जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असेल, तर तुम्ही वाहतूक विभागाकडे तक्रार करू शकता.




























































