
1 वाहतूक पोलिसांना वाहन चालकांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थांबविण्याचा, चौकशी करण्याचा आणि दंड करण्याचा अधिकार आहे, परंतु मारण्याचा अधिकार आजिबात नाही.
2 गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर वाहन चालकाला मारहाण केल्यास संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो.
3 पोलीस अधिकारी तुम्हाला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढू शकत नाही. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार, तुमच्या गाडीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेणे बेकायदेशीर आहे.
4 जर अशी घटना घडली तर त्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो. जर गुन्हा दाखल झाला नाही तर राज्य गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल करू शकता.
5 वाहन तपासणीवेळी जर कुणी लाच मागितली तर तर अजिबात पैसे देऊ नका. लाच देणे किंवा स्वीकारणे बेकायदेशीर आहे. पैसे मागितल्यास फोनमध्ये व्हिडीओ चित्रित करा.




























































