
शाळा सुरू झाल्या आहेत. मुले शाळेत आनंदाने, उत्साहाने जातात. पण काही मुले शाळेत जायला लागू नये म्हणून कारणे शोधतात, तर काही रडारड करतात.
मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी ‘कम्फर्टेबल’ करण्यासाठी प्रयत्न करा. मुलांचा दिनक्रम ठरवा. शाळा जर सकाळची असेल आणि मुलांची झोपमोड झाली तर ते चिडचिड करतात.
मुलांच्या खाण्यापिण्याचा, अभ्यासाचा, खेळण्याचा आणि स्क्रिन टाइमचा वेळ सेट करा. त्यांच्यासोबत खेळा किंवा संवाद साधा. मुलांसमोर नेहमी शाळेबद्दल चांगल्या गोष्टी बोला.
मुलांना शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करा. उदा. शाळेतून घरी आल्यानंतर आज काय शिकवले, नवीन कोणती गोष्ट शिकलात. त्यांच्या मित्र-मैत्रिणींबद्दल विचारा.
मुलांच्या शिक्षकांशी बोलणे महत्त्वाचे आहे. त्यांना क्लासमध्ये कोणत्या अडचणी येत आहेत का हे तपासा करा. त्यांचा वर्गमित्र त्रास देत असेल किंवा चिडवत असेल वगैरे.

























































