असं झालं तर… रेल्वे प्रवासात कोणी दमदाटी केली तर…

शाळांना दिवाळीच्या सुट्टय़ा मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक जण एका शहरातून दुसऱया शहरात रेल्वेने प्रवास करतात, त्या वेळी दुसऱया प्रवाशांकडून त्रास दिला जातो.

कन्फर्म सिटवर कोणी मुद्दामहून बसत असेल किंवा तुमच्याशी भांडण करून तुम्हाला दमदाटी करत असेल तर घाबरून जाऊ नका. तुम्ही तत्काळ रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करा.

कोणी तुमच्याशी भांडत असेल तर तुम्ही तिकीट तपासणीस (टीटीई) यांना घटनेची माहिती द्या. उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस (आरपीएफ) जवानांना संपर्क साधा.

पुढच्या स्टेशनला उतरून तुम्ही स्टेशन मास्टर, रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीत घटना कधी आणि कुठे घडली याची माहिती द्या.

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवरही तक्रार नोंदवू शकता. जर शक्य असेल तर घटनेचा व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा.