
मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला वीज बिल भरणे आवश्यक आहे. जर वीज बिल भरले नाही तर मीटर कापून घेण्याची शक्यता असते. जर तुमचे वीज बिल थकले असेल तर काय कराल.
सर्वात आधी खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित होण्यापासून वाचण्यासाठी आणि वीज वितरण कंपनीकडून होणारा दंड टाळण्यासाठी थकबाकी असलेले बिल त्वरित भरा.
तुम्हाला बिल भरण्यात अडचण येत असेल किंवा बिलामध्ये काही चुकी असेल, तर वीज वितरण कंपनीशी संपर्क साधा. त्यांना अडचणीची लेखी माहिती द्या व वीज बिल भरण्यासाठी वेळ मागा.
जर तुम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त बिल थकवले असेल, तर सुरक्षा ठेवीतून रक्कम कापली जाऊ शकते. असे केल्यास काही अडचण येणार नाही. पैसे आल्यानंतर पुन्हा सुरक्षा ठेव करू शकता.
वीज बिलाच्या थकीत रकमेबद्दल येणारे संशयास्पद मेसेज किंवा कॉलकडे दुर्लक्ष करा. बऱ्याचदा वीज बिल थकले आहे, असे सांगून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.




























































