मोबाईल स्क्रीन हिरवा दिसत असल्यास… हे करून पहा

मोबाईलच्या स्क्रीनवर हिरव्या रेषा किंवा संपूर्ण मोबाईल स्क्रीन हिरवा दिसू लागतो. जर तुम्हालासुद्धा ही समस्या येत असेल तर सर्वात आधी फोनला रिस्टार्ट करून पाहा. रिस्टार्ट केल्यानंतर ही समस्या गायब होते. फोनचे सॉफ्टवेअर अपडेट आहे की नाही, हेही तपासून पाहा. मोबाईलच्या डिस्प्ले सेटिंग्समध्ये जाऊन ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट किंवा कलर टोन तपासून घ्या.

फोन खाली पडल्यानंतर अशी समस्या येऊ शकते. फोनच्या आतल्या भागाचे किंवा डिस्प्ले केबलचे नुकसान झाल्यास फोनचा डिस्प्ले हिरव्या रंगाचा दिसू लागतो. फोन जास्त गरम झाल्यानंतरसुद्धा डिस्प्लेमध्ये बिघाड होऊन ही समस्या येते. तर मोबाईलला दुरुस्त करणे गरजेचे आहे.