असं झालं तर… जन्म प्रमाणपत्रातील नाव, तारीख चुकल्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन्म प्रमाणपत्र हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे जन्म प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड असता कामा नये. जर यावर नाव किंवा तारीख चुकीची असेल तर काय कराल.

सर्वात आधी स्थानिक प्रशासकीय कार्यालयातून ‘जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती/सुधारणा फॉर्म’ मिळवा. काही ठिकाणी तो ऑनलाइन उपलब्ध असू शकतो.

फॉर्ममध्ये तुमची माहिती आणि तुम्हाला बदल का करायचा आहे, याचे स्पष्टीकरण लिहा. शपथपत्रात तुम्ही तुमची चुकीची माहिती आणि योग्य माहिती नमूद कराल.

इतर ओळख आणि जन्माचे पुरावे जसे की, हॉस्पिटल डिस्चार्ज प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्डसह सर्व कागदपत्रे आणि अर्ज संबंधित कार्यालयात जमा करा.

जन्मतारीख बदलण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज भासू शकते. जर रजिस्ट्रारने अर्ज नाकारला, तर रिट अधिकार क्षेत्राअंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते.