तुमच्या खात्यात अनपेक्षितपणे मोठी रक्कम आली…

  • जर चुकून तुमच्या बँक खात्यात अनोळखी व्यक्तीकडून किंवा बँकेच्या चुकीमुळे मोठी रक्कम जमा झाली तर ती रक्कम तुमची होऊ शकत नाही. या संदर्भात काही नियमावली आहे.
  • लगेचच तुमच्या बँकेला संपर्क साधून या संदर्भात माहिती द्या. बँकेच्या ग्राहक संरक्षण केंद्राला संपर्क साधा अथवा, तुमच्या आजूबाजूला कुठे शाखा असेल तर तिथे जाऊन माहिती द्या.
  • बँकेच्या चुकीमुळे खात्यात जास्तीचे पैसे जमा होतात. बँक त्वरित ते खाते गोठवते आणि चौकशी सुरू करते. खातेदाराने हे पैसे काढू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • बँक चुकीने जमा झालेले पैसे परत घेते. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच खात्यावरचे निर्बंध उठवले जातात. जर पैशाचा स्रोत अज्ञात राहिला, तर सरकारी एजन्सी तपास करतात.
  • पैसे काढणे बेकायदेशीर ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये कलम 403 लागू होते. चुकीने जमा झालेले पैसे परत न केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.