
गोऱ्या व्यक्तीचेही कोपर काळे पडतात. जर कोपर नैसर्गिकरीत्या उजळ करायचे असतील तर काही घरगुती उपाय आहेत. त्वचेला पुरेशी आर्द्रता न मिळाल्यास ती कोरडी होऊन काळी पडू शकते. तसेच कोपर सतत घासले जात असतील तर तिथे काळे डाग पडू शकतात. बेसन, दही आणि लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण कोपरांवर लावा.
कोपराला जास्त घासणे टाळा. जर कोपर काळे पडले असतील तर लिंबाच्या रसामध्ये साखर मिसळून हे मिश्रण कोपरांवर चोळा. नारळ तेल कोपरांवर नियमितपणे लावल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होईल. कापलेला बटाटा कोपरांवर चोळल्यास काळे डाग कमी होऊ शकतात.