असं झालं तर…टोल प्लाझावर दोनदा पैसे कापले गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही रोख पैसे दिले आणि नंतर फास्टॅगमधूनही पैसे कापले गेले, तर काळजी करू नका. याला ‘डिस्प्यूट’ म्हणतात. बँकेला कळवून तुम्ही ते पैसे रिफंड मिळवू शकता.

फास्टॅगमधून दोनदा पैसे कापले गेल्यास, घाबरून नका. NHAI हेल्पलाईन क्रमांक 1033 वर कॉल करा किंवा [email protected] ईमेलद्वारे तक्रार नोंदवा.

फास्टॅग वजावट झाल्याचा मेसेज किंवा स्क्रीनशॉट, बँक स्टेटमेंट, वाहनाचा नंबर, टोल प्लाझाचे नाव, दिनांक आणि प्रवासाची वेळ हे आवश्यक पुरावे सोबत ठेवा.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर, कंपनी पडताळणी करते. पडताळणी पूर्ण झाल्यावर अतिरिक्त कापलेले पैसे 7 ते 15 दिवसांत तुमच्या खात्यात जमा केले जातात.

कोणत्याही कारणास्तव बँक किंवा NHAI कडून वेळेत समाधान न मिळाल्यास, तुम्ही RBI बँकिंग लोकपाल (14448) कडेदेखील तक्रार नोंदवू शकता.