व्हॉट्सऍप ग्रुपवर फोन नंबर होणार ‘हाइड’, नवे फीचर लवकरच 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकप्रिय सोशल मीडिया ऍप सध्या व्हॉट्सऍप एका नवीन फीचरवर काम करत आहे. त्याद्वारे व्हॉट्सऍप ग्रुपमधील इतर सदस्य आपला नंबर पाहू शकणार नाही. म्हणजेच आपल्याला व्हॉट्सऍप ग्रुपवर फोन नंबर ‘हाइड’ करता येईल. 

 बऱयाचदा आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येते. त्या ग्रुपमध्ये आपल्या कुणी ओळखीचे नसते. मात्र त्या ग्रुपमध्ये सहभागी असलेले इतर व्यक्ती तुमचा नंबर पाहू शकतात किंवा ते तुमचा नंबर सेव्हदेखील करू शकतात. म्हणून व्हॉट्सऍप नवीन फीचर घेऊन येत आहे.   या आगामी फीचर्सची माहिती व्हॉट्सऍपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱया डब्ल्यूएबीटाइन्फो या वेबसाइटने शेअर केली आहे.