व्हॉटस्ऍपची डार्कथीम असणार ‘रंगीबेरंगी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात व्हॉटस्ऍपने ऍण्ड्राइड बिटा युजर्ससाठी डार्क मोड आणले होते. युजर्स खूप दिवसांपासून या फीचरच्या प्रतीक्षेत होते. आता मिळालेल्या नव्या अपडेटनुसार या डार्कमोडसोबत युजर्सना अनेक रंगांचे ऑप्शनदेखील मिळणार आहेत. व्हॉटस्ऍपच्या सेटिंगमध्ये जाऊन युजर्स डार्कमोडला इनेबल किंवा डिसेबल करू शकतात. ऍपच्या बिटा व्हर्जन 2.20.13 मध्ये डार्कमोडसंबंधी ऑप्शन आहे. हे ऑप्शन निवडताना सहा रंगांचे पर्याय मिळतील. या वॉलपेपर्सना ऍपच्या डार्कथीमसोबत वापरता येईल. यात जांभळा, मरून, चॉकलेटी, निळा आणि ऑलिव्ह हे रंग आहेत. डार्कथीमसाठी वॉलपेपर निवडल्यानंतर ग्रुप आणि वैयक्तिक चॅटस्साठीदेखील वॉलपेपर बदलता येऊ शकतात.