
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर अपडेट करत असते. व्हॉट्सअॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फिचरमध्ये लवकरच एक नवीन अपडेट येणार असून मेसेज डिलीट करण्यासाठी आता वेळमर्यादा वाढणार आहे. व्हॉटसअॅपच्या नवनवीन फिचरबद्दल वेळोवेळी माहिती देणाऱया wabetainfo ने याबाबत माहिती दिली आहे.
सध्या व्हॉट्सअॅप ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरची वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे. ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हा पर्याय 2017 मध्ये सादर केला होता. सुरुवातीला सात सेपंदांची वेळ मर्यादा होती जी नंतर 2018 मध्ये 4096 सेपंदांपर्यंत वाढवली होती. आता एका रिपोर्टनुसार, ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ वापरण्याची वेळ मर्यादा वाढवली जाऊ शकते पिंवा भविष्यातील अपडेटमध्ये टायमर पूर्णपणे काढला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना मेसेज कधीही डिलिट करता येतील.

























































