
व्हॉट्सअॅपने एक नवीन व्हाईस चॅट फिचर लाँच केले आहे. त्यामुळे आता यूजर्सला खूप मोठे आणि लांब मेसेज टाईप करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हाईस चॅट टूलद्वारे युजर्स थेट बोलून ग्रुपमध्ये चॅटिंग करू शकतील. याआधी ग्रुप चॅटिंगमध्ये युजर्सला टाईप करावे लागत होते. परंतु, आता ग्रुप चॅटिंगवेळी केवळ बोलून चॅट तयार होईल, अशी सुविधा या नव्या फिचरमध्ये युजर्सला मिळणार आहे. हे फिचर आधी मोठया ग्रुप्ससाठी तयार करण्यात आले होते. परंतु, आता हे सर्व ग्रुपसाठी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही छोटा किंवा मोठा ग्रुप असेल तर युजर्स व्हाइसमधून चॅट करू शकतो. हे फिचर अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करण्यात आले आहे. हे फिचर रियल टाइम ग्रुप कॉल सारखा युजर्सला अनुभव देतो. यासाठी वेगळे कॉल सुरू करण्याची गरज पडत नाही.