व्हॉटस्ऍप मेसेज आपोआप होणार डिलीट, ऍडमिनला मिळणार जादा पॉवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरज असते म्हणून ग्रुप्सवर राहणे भाग असते, पण त्यावरील नको ते भरपूर मेसेज आल्यामुळे त्रासला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ग्रुप्सवरील मेसेज आता आपोआप डिलीट होण्याची सुविधा व्हॉट्सऍपवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

‘डब्ल्यूए बीटा इन्फो’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मेसेज आपोआप डिलीट होण्याची सुविधा केवळ ग्रुप्स चॅटिंगसाठीच देण्यात येणार आहे. हे मेसेजेस किती काळाने आपोआप डिलीट करायचे हे ठरविण्याचे काम ऍडमिन करणार आहे. त्यामुळे ग्रुप्सच्या ऍडमिन्सना आता जादा पॉवर मिळू शकणार आहे.

असे काम करणार हे फीचर
या फीचरला ऑन आणि ऑफ करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे.
ही सुविधा देतानाच युजर्सना ऍपवर काही जाहिराती पाहण्याचीही तयारी ठेवावी लागणार आहे.
डिलीट करण्याचा कालावधी एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना आणि एक वर्ष या रूपात असेल.
डिलीट झालेले मेसेज मेसेज बॅकअपमध्येही सेव्ह होणार नाहीत.