WhatsApp च्या जागी Signal अ‍ॅपचा वापर करताय? जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी…

‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या नवीन खासगी पॉलिसीमुळे अनेक वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपपासून दूर जाताना दिसत आहे. या पॉलिसीमुळे अनेक लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या जागी आता नवीन ‘सिग्नल’ अ‍ॅपचा वापर करत आहेत. सिग्नल अ‍ॅप हिंदुस्थानात पूर्णपणे नवीन आहे. यामुळे हे अ‍ॅप वापरण्याआधी याबद्दल तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला हे अ‍ॅप हाताळणे सोपे होईल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत सिंगल अ‍ॅप वापरकर्त्यांची खूप कमी माहिती ऍक्सिस करतो. टेस्लाचे सीईओ एलन मस्क हेही सिग्नल अ‍ॅप वापरण्याविषयी बोलले आहे. चला तर सिग्नल अ‍ॅपच्या वापराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

स्क्रीन लॉक सेट करा

सिग्नल अ‍ॅपमध्ये स्क्रीन लॉक फंक्शन दिले गेले आहे. अशातच जर तुमचा फोन अनलॉक असला तरी तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. कारण सिग्नल अ‍ॅप वापरण्यासाठी पिन किंवा बायोमेट्रिक लॉक आवश्यक असेल. यासाठी वापरकर्त्याने प्रथम सिग्नल अ‍ॅपच्या सेटिंग्जमधून गोपनीयता व स्क्रीन लॉक पर्यायावर जाणे आवश्यक आहे.

नोटिफिकेशन्स ऑफ करा

सध्या बरेच वापरकर्ते सिग्नल अ‍ॅप इन्स्टॉल करत आहेत. अशातच आपल्याला सर्व संपर्क याद्यांकडून सूचना प्राप्त होतील. यापासून वाचण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशन्स आणि Toggle contact joined signal off वर क्लिक करा.

Disappearing मेसेज

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच Disappearing मेसेजचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र सिग्नल अ‍ॅपमध्ये हे फिचर बर्‍याच काळापासून वापरले जात आहे. यात मेसेज गायब करण्याच्या टाईमिंग लिमिट सेट करणायचाही ऑप्शन देण्यात आला आहे. यासाठी वारकर्त्याला संबंधित व्यक्तीच्या नावावर क्लिक करावं लागेल. यानंतर Disappearing मेसेज दिसणार, जिथे तुम्ही मेसेज गायब करण्याचा टाईमिंग सेट करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या