
व्हॉटस् ऍपकर नुकतेच एक भन्नाट फीचर आले आहे. तुम्ही एखाद्याला व्हिडिओ पाठवण्यापूर्की त्याचा आवाज बंद म्हणजेच म्यूट करता येणार आहे. बऱयाच काळापासून कंपनी या फिचरवर काम करत होती, आता मात्र युजर्सची प्रतीक्षा संपली आहे.
व्हॉटस् ऍपच्या बीटा वर्जन 2.21.3.13 वर हे फीचर उपलब्ध होणार आहे. सध्या याचे स्टेबल वर्जन आले आहे. व्हॉटस् ऍपचे म्यूट व्हिडीओ फीचर व्हिडीओ पाठवण्याच्या विंडोमध्येच एडिट व्हिडीओ या ऑप्शनजकळ आहे. वरच्या बाजूला डावीकडे स्पीकरचे ऑप्शन आहे. हा व्हिडीओ म्यूट करण्यासाठी यूजरला तो कोणाला पाठवण्याआधी स्पीकर आयकॉनवर क्लीक करावे लागेल.






























































