ऐसा पहली बार हुआ है… व्हॉट्सअप ‘ते’ जुनं फिचर पुन्हा लाँच करणार

चॅटींग आणि मेसेजिंगसाठी हिंदुस्थानात मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे व्हॉट्सअप अॅप युझर्सच्या मागणीनुसार नवनवीन फिचर्स आणते, तर जास्त वापरात नसलेले फिचर्स बंद करण्यात येतात. यंदा मात्र व्हॉट्सअप जूनं फिचर नव्यानं लाँच होणार आहे.

कंपनीनं आपलं एक जुनं फिचर पुन्हा एकदा वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे फिचर कंपनीनं जवळपास वर्षभरापूर्वी बंद केलं होतं. आता पुन्हा नव्यानं ते युझर्सला वापरता येणार आहे.

व्ह्यू वन्स ‘View Once’ असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर असं आहे की ज्यामध्ये पाठवलेली व्हिडीओ, फोटो फाईल समोरच्याला एकदाच पाहता येते. तसेच फाईल सेव्ह करता येत नाही. याच कारणामुळे फिचरला ‘View Once’ असं नाव देण्यात आलं आहे.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार हे फिचर काही बिटा युझर्सना पुन्हा वापरता येणार आहे. आणि लवकरच सर्व युझर्ससाठी देखील हे फिचर उपलब्ध होणार आहे.