
युझर्सच्या अनुभव आणि मागण्यांनुसार ‘व्हॉट्सअॅप’मध्ये अनेक बदल होत असतात. या वर्षीही व्हॉट्सअॅपमध्ये अनेक एक नवे फिचर येणार आहे. या नव्या फिचरमुळे वापरकर्त्याला ‘चॅट’चा अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. मात्र 1 फेब्रुवारी 2020 या दिवसापासून लाखो स्मार्टफोन्स वापरकर्त्यांना या फिचरचा अनुभव घेता येणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅपचा वापर पुढेही चालू ठेवण्यासाठी जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोन धारकाला 31 जानेवारी 2020 पर्यंत नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच नवे फिचर अपडेट होणार आहे. हे फिचर जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोन्सवर सपोर्ट होणार नाही. त्यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन्सवर व्हाट्सअॅप कार्यान्वित होणार नाही. यात अॅन्ड्रॉइड 2.3.7 आणि त्याच्यापेक्षा जुने अॅन्ड्रॉइड व आयओएस 7 आणि त्याच्यापेक्षा जुने ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप कार्यन्वित होणार नाही.
नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅप कार्यन्वित करू न शकणाऱ्या स्मार्टफोन्सची संख्या 75 लाखांहून अधिक असल्याचा रिपोर्ट गुगलने काहीदिवसांआधी सादर केला होता. त्यामुळे निश्चित आहे की, जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोन धारकांना व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. भविष्यातही व्हॉट्सअॅप हे अनेक नवे फिचर लाँच करणार असल्याने ते फिचर जुन्या ओएस स्मार्टफोनला सपोर्ट करणार नाही. तसेच प्रायव्हसीलाही भीती असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

























































