व्हाट्सअॅपचे नवे फिचर युझर्सला घालतेय भूरळ, तुम्ही वापरले का?

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे आणि दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी एक नवे फिचर बाजारात आणले आहे. आजपासून व्हॉट्सअॅपद्वारे युझर्स ग्रुप कॉलिंग या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. फेसबूकच्या F8 डेव्हलपर कॉन्फ्रेंसमध्ये व्हॉट्सअॅपने ही घोषणा केली होती. व्हाईस आणि व्हिडीओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची देखील सुविधा देण्यात येईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. हे फिचर आजपासून जगभरात लाईव्ह झाल्याची माहिती आता व्हॉट्सअॅपने दिली आहे.

हे देखिल वाचा – व्हॉट्सअॅपवर या पुढे फक्त ५ मॅसेज फॉरवर्ड होणार!

व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) या ग्रुप कॉलिंग फिचरद्वारे एका वेळेला चार लोकांना संपर्क साधता येणार आहे. हे चार लोक कुठेही असले तरी या सुविधेचा वापर करता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) या नव्या फिचरमुळे यूजर्स जास्तीत जास्त ४ जणांना व्हिडिओ किंवा व्हाईस कॉल एकावेळी करु शकणार आहे.

एनक्रिप्टेड ग्रुप कॉल
व्हॉट्सअॅपच्या या व्हिडीओ आणि व्हाईसच्या प्रायव्हसीबाबत लोकांना शंका असल्याने कंपनीने हे सर्व मेसेज आणि ग्रुप कॉल एनक्रिप्टेड असणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.

दरम्यान, हे नवे फिचर व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) iOS आणि अँड्रॉईड व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपने (WhatsApp) यापूर्वी २०१६मध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा सुरु केली होती. तर २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप व्हाईस कॉलिंग सुविधा सुरू केली होती. आता ग्रुप कॉलिंगची सुविधाही देण्यात आल्याने युझर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Summery – Whatsapp new group video and voice calling feature is now live