व्हॉट्सअॅप कॉलमध्ये नवीन फिचर; वाचा सविस्तर…

1283

व्हॉट्सअॅपने चार वर्षापूर्वी वॉइस कॉलिंग फिचर लाँच केले होते. त्यावेळी वॉइस कॉलदरम्यान अनेक समस्या यूजर्सना येत होत्या. व्हॉट्सअॅप कॉल दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅपने कॉलिंगमध्ये एक नवीन फिचर अॅड केले आहे. त्यामुळे कॉलिंदगरम्यान येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत.

व्हॉट्सअॅपच्या यूजरसाठी कॉल वेटिंग ( call waiting) हे नवीन फिचर आणले आहे. पूर्वी वॉइस कॉलदरम्यान आलेला दुसरा कॉल पूर्वी दिसत नव्हता. आता त्याचवेळी आलेला दुसरा कॉल वेटिंगला असल्याचे दिसेल. दुसरा कॉल महत्त्वाचा असल्यास यूजर पहिला कॉल कट करुन दुसऱ्या कॉलवर बोलू शकतो. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यावर हे फिचर यूजर्सना दिसेल. या नवीन फिचरमध्ये कॉल होल्डवर टाकणे किंवा मर्ज करण्याचा कोणताही पर्याय नाही.

आपली प्रतिक्रिया द्या