भट नाही कपूर..! रणबीर-आलियाच्या नात्यावर काजोलचा शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यानंतर सर्वात चर्चेत असणारी जोडी म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून गुटरगू चालल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत असते. अनेक वेळा या दोघांना एकमेकांसोबत पाहिले गेले आहे. आता अभिनेत्री काजोल हिने देखील या दोघांमध्ये रिलेशनशीपवर शिक्का लगावला आहे. एका कार्यक्रमात चुकून तिने आलिया भट हिचा उल्लेख आलिया कपूर असा केला आणि पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

रणवीर-दीपिकाचा ठरलं, आता रणबीरसोबत लग्नाच्या चर्चांवर आलियाचे मोठे वक्तव्य

काजोल नुकतीच तिचा आगामी चित्रपट हेलिकॉप्टर ईला याच्या प्रमोशनसाठी नेहा धूपिया हिच्या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये ती आलियाबाबत चर्चा करताना दिसून आली. याच शोमध्ये तिने चुकून आलिया भट्ट हिचा आलिया कपूर असा उल्लेख केला. आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने यात सुधारणा केली. परंतु तोपर्यंत काजोलची ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

‘या’ अभिनेत्यासोबत लग्नासाठी आलिया ‘राझी’

काजोलने आलियाचा आलिया कपूर असा उल्लेख केल्यानंतर रणबीरसोबत तिच्या लग्नाच्या वावड्याही उठल्या असून लवकरच ते विवाह करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच दरम्यान, आलिया आणि रणबीरची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. परंतु दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी निर्माता करण जोहरकडे चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनकडे अधिक वेळेची मागणी केली आहे.