
डेल्टा प्लस हा कोरोनाचा नवा वॅरिएंट तिसऱया लाटेला कारणीभूत ठरू शकतो. हा कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार असून निष्काळजीपणा घातक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही आज टास्क फोर्स व पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्यावी, असे आदेश अधिकाऱयारांना दिले आहेत. डिसेंबरपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्व जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याचे पेंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.





























































