जेसीबी मशिन पिवळ्या रंगाचेच का असते, जाणून घ्या कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनंदिन जीवन जगत असताना आजूबाजूला अनेक वस्तू आपण पाहतो. त्यांचा रंग, ठेवण, काम करण्याची पद्धत ठरलेली असते. ती तशीच असण्यामागे काहीतरी विशेष हेतू असू शकतो, हे आपल्या बऱ्याचदा लक्षात येतेच असे नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असतात. या कामासाठी जेसीबी मशिनचा वापर आवर्जून केला जातो. तुम्हाला माहित आहे का, एकेकाळी या मशिनचा रंग पांढरा किंवा लाल होता. आज आपल्याला जे जेसीबी मशिन दिसते त्याचा रंग पिवळा असतो. सर्वत्र पिवळ्याच रंगाचे जेसीबी मशिन आपण पाहतो. जाणून घेऊया जेसीबी मशिनचा रंग पिवळा का असतो? यामागचे कारण.

पूर्वी जेसीबी मशिनचा रंग पांढरा किंवा लाल असायचा. त्यानंतर जेसीबीच्या मागणीत वाढ झाली. मशिनची मागणी वाढल्याने कंपन्यांनी मशिनचा रंग बदलायला सुरुवात केली. जेव्हा कंपनीच्या लक्षात आले की, जेसीबी यंत्राची मागणी वाढत आहे, तेव्हा त्यांनी त्याचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला, मात्र या यंत्राला हा रंग देण्याबाबत बराच विचार करण्यात आला. याबाबत खूप काळजीही घेण्यात आली. व्यापक विचार आणि दूरदृष्टीने अभ्यास करूनच पिवळ्या रंगाचे जेसीबी मशिन बाजारात उपलब्ध करून देण्यात आले, मात्र याचा रंग पिवळाच असण्यामागे नक्की काय कारण असू शकेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जेसीबी यंत्र पिवळ्या रंगाचे असण्यामागे काही खास कारणे लपलेली आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे पूर्वी जेसीबी यंत्राचा रंग लाल किंवा पांढरा असायचा, मात्र बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू असताना हे यंत्र दुरून दिसत नव्हते. रात्रीच्या वेळी अंधारात काम करताना दुरून पांढऱ्या आणि लाल रंगाचे जेसीबी यंत्र कामगारांना दिसत नसे. त्यामुळे या यंत्राला पिवळा रंग देण्यात आला. त्यामुळे कंपन्यांनी जेसीबी मशिनला पिवळा रंग दिला. जेणेकरून पिवळा रंग दुरून दिसावा. आता या मशिनचा पिवळा रंग दुरूच दिसतो. त्यामुळे बांधकाम सुरू असल्याचे लोकांना समजते.

पिवळ्या रंगाचे वैशिष्ट्य असे की, इतर रंगांपेक्षा पिवळ्या रंगात आकर्षण क्षमता असते. इतर रंगांपेक्षा डोळ्यांना हा रंग लवकर दिसतो. पिवळा रंग तुम्हाला पटकन, सहज आकर्षित करतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जेसीबी मशिनला पिवळा रंग देण्यात आला.

जेसीबी हे नाव कसे पडले?
अतिशय मोठे आणि रस्त्यांच्या बांधकामाकरिता उपयुक्त असलेले हे मशीन ‘जेसीबी’ या नावाने ओळखे जाते. असे असले तरीही प्रत्यक्षात या मशीनचे ते नाव नसून जेसीबी हे नाव मशिन बनवणाऱ्या कंपनीचे आहे. जेसीबी हे मशीन बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे मालक आणि संस्थापक ब्रिटिश अब्जाधीश जोसेफ सिरिल बामफोर्ड हे होते. त्यांच्या नावावरून कंपनीचे नाव ठेवण्यात आले. कंपनीच्या नावावरून हे मशीन ओळखले जाऊ लागले. या मशीनचे योग्य नाव ‘बॅकहो लोडर’ आहे.