… म्हणून 6 महिने गर्भवती असल्याचे लपवले, अभिनेत्रीचा लग्नानंतर खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचे 10 मे रोजी लग्न झाले. लग्नावेळी ती गर्भवती असल्याच्या बातम्या देखील काही प्रसारमाध्यमांनी दिल्या. त्यामुळेच नेहाने झटपट लग्न उरकल्याचे काहींनी म्हटले होते. त्यानंतर नेहा आणि अंगदने सर्वांसमोर येत आमच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे, असे जगजाहीर केले होते. गर्भवती नेहाचे काही फोटोही त्यांना सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान, याच संदर्भात ‘मिड डे’ ने एक वृत्त दिले आहे.

अभिनेत्री नेहाच्या घरी ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

या वृत्तानुसार, नेहाने आपण गर्भवती असल्याची माहिती बराच काळ लपवून ठेवली होती. याबाबत नेहाने सांगितले की, गर्भवती असल्याचे कळाल्यानंतर मला काम मिळणार नाही याची चिंता होती. परंतु साधारण 6 महिन्यांपर्यंत माझ्या पोटावरून मी गर्भवती असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही ही चांगली गोष्ट आहे. माझ्यात चांगली उर्जा असल्याने निभावून नेलं. तसेच नेहा पुढे म्हणाली की, काही महिला या दिवसांमध्ये कामातून सुट्टी घेतात, याबाबत माझे कोणतेही दुमत नाही. हा माझा निर्णय होता, असेही ती म्हणाली.

नवऱ्यावरून नेटिझन्सने नेहाला केले ट्रोल


View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on