दिवसा दुपारी झोपू नये असे का म्हणतात?

दुपारी झोपणं म्हणजे दारिद्र्याचे लक्षण, असे आपले वरिष्ठ लोक सांगायचे. मात्र यामागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत. आज आपण याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

शास्त्रज्ञांनी 3 लाख लोकांच्या झोपण्याच्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हे सांगितलं आहे की, दुपारी जास्त वेळ झोपल्याने तुम्हाला हृदयाचा आजार होऊ शकतो आणि अकाली निधन सुद्धा होऊ शकतं.

40 मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागेल, असं डॉक्टर सांगतात. दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता अधिक असते, असं तज्ञ सांगतात.

डायबेटिस आणि स्थूलपणा याचं सुद्धा प्रमुख कारण हे रोज दुपारी 40 मिनिटांपेक्षा जास्त झोपणे हे असू शकतं, असं काही रिसर्च सांगतात. 60 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटिस 2 या प्रकारच्या आजाराला समोरं जावं लागण्याची शक्यता 50% ने अधिक वाढते.

त्यासोबतच छातीचे आजार होण्याचं प्रमाण सुद्धा 82% ने वाढतं, असं रिसर्च सांगतात. अकाली निधनाचं प्रमाण हे दुपारच्या झोपण्याने 27% ने वाढतं असं एका अभ्यासात सांगण्यात आले आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सुभाष गिरी यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या