विफा महिला लीग फुटबॉल आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विफा महिला फुटबॉल लीगची रंगत उद्यापासून मुंबईतील कुपरेज ग्राऊंडमध्ये पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत 18 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस होईल. या स्पर्धेत मुंबईतील 11 संघ, पुण्यातील 4 संघ, कोल्हापूरमधील 2 संघ आणि साताऱयातील 1 संघ सहभागी झाला आहे. 22 डिसेंबरला जेतेपदाचा फैसला होईल. तसेच मुंबई बॉडीलाइन एससी व पुणे डेक्कन इलेव्हन यांच्यामध्ये सलामीची लढत रंगेल.

गटवारी खालीलप्रमाणे

अ – फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया (मुंबई), कम्युनिटी फुटबॉल क्लब ऑफ इंडिया (मुंबई), बॉडीलाइन एससी (मुंबई), डेक्कन इलेव्हन (पुणे), उत्कर्ष क्रीडा मंच एफसी (पुणे), रिवा एफसी (कोल्हापूर).

ब – पिफा कुलाबा एफसी (मुंबई), स्पार्क एफसी (मुंबई), सॅम्यूएल एफए (मुंबई), दक्षिण मुंबई युनायटेड एफसी (मुंबई), स्नीगमे एफसी (पुणे), कमांडोज एफसी (पुणे), पॅकॅनगन एफसी (सातारा).

क – फ्युचर स्टार्स एफसी (पुणे), इंडिया रश एफसी (मुंबई), केंकरे एफसी (मुंबई), फुटबॉल लीडर्स ऍकॅडमी (मुंबई), एफसी कोल्हापूर सिटी (कोल्हापूर).