धक्कादायक! किरकोळ वादातून पत्नीची डोक्यात तवा मारून हत्या

 

घरघुती किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात तवा मारून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

कला आदिनारायन यादव (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. कला आणि त्यांचा पती आदिनारायन दोघेही मांजरीतील केशवनगर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते. दोघेही मोल मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यात किरकोळ कारनावरून घरगुती वाद होते.

आज सकाळीही त्यांच्यात वाद झाले. वादातून रागाच्या भरात आदीनारायणने पत्नी कला यांच्या डोक्यात चुलीवरचा तवा मारून त्यांचा खून केला. शेजाNयांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या