पत्नीला प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार; पतीची परवानगी घेण्याची गरज नाही – उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीला पती इतकाच संपत्ती विकण्याचा अधिकार आहे. यासाठी पत्नीला पतीची परवानगी घेण्याची गरज नाही, फक्त संपत्ती ही पत्नीच्या मालकीची किंवा तिच्या नावावर असायला हवी, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने दिला. घटस्फोट प्रकरणावर सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पतीला क्रूरता आणि परित्याग याच्या आधारावर घटस्पह्ट देण्याची परवानगी मिळण्याचा कौटुंबिक न्यायालयाने जो आदेश दिला होता त्या आदेशाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती प्रसेनजीत बिस्वास यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी केली. पती-पत्नी दोघेही शिक्षित आहेत. जर पत्नी पतीच्या परवानगी विना आपल्या नावावर असलेली संपत्तीची विक्री करीत असेल तर ही कोणत्याही प्रकारची क्रूरता होत नाही. 2014 मधील हे प्रकरण आहे. खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी पतीने पैसे दिले. त्यावेळी पत्नीकडे कोणताही इन्कम सोर्स नव्हता, असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी न्यायालयात केला. यावर न्यायालयाने म्हटले की, हे खरे मानूया. परंतु, संपत्ती सध्या पत्नीच्या नावावर आहे. पत्नीला पतीची संपत्ती मानले जाऊ शकत नाही. तसेच तिच्याकडून ही अपेक्षा केली जाते की, कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी पतीची परवानगी घ्यायला हवी. जर पती पत्नीच्या परवानगीविना आपल्या नावावर असलेली संपत्ती विकू शकतो तर पत्नीही तिच्या नावावर असलेली संपत्ती विकू शकते. यासाठी पतीला पतीची परवानगी घेण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.