बायकोने स्पर्श केला आणि नवरा कोमातून खडबडून उठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णालयातील एका रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अवयव दानासाठी डॉक्टरांनी तयारी सुरू केली. पतीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याची पत्नी आली. तिने त्याला स्पर्श करताच अचनाक त्याच्या हृदयाचे ठोके सुरू झाले आणि त्याने शरीराची हालचाल केली. त्यामुळे तेथे उपस्थित असणारे डॉक्टरही चक्रावले. त्यांनी तातडीने रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले आणि उपचाराला सुरुवात केली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीनामध्ये घडली आहे.

रियान मार्लो यांना गेल्या महिन्यात रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना लिस्टेरिया या आजाराने ते ग्रासले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूला सूज आली आणि ते कोमामध्ये गेले. डॉक्टरांनी 27 ऑगस्टला त्यांना ब्रेन डेड घोषित केले. नॉर्थ कॅरोलीनामधील कायद्यानुसार मेंदून काम बंद केलेल्या (ब्रेन डेड) रुग्णांना मृत घोषित करण्यात येते. त्यामुळे डॉक्टरांनी रियान यांना मृत घोषित केले.

रियानच्या पत्नी मेघन यांनी सांगितले की., डॉक्टर आपल्याजवळ आले आणि ते म्हणाले, तुमच्या पतीचे निधन झाले आहे. मृत्यूच्या दाखल्यावर न्यूरोलॉजिकल डेथ असे लिहून वेळ मृत्यूची वेळ टाकण्यात आली. आपल्या पतीने अवयवदान केल्याची माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिली. तसेच त्यांच्या अवयवदानाची तयारीही करण्यात आली. पतीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आपण गेलो. त्यावेळी आपण त्याला स्पर्श केला आणि आपल्याला त्याच्याशी जे काही बोलायचे होते, तो मनमोकळेपणाने बोललो. त्यानंतर अचानक चमत्कार व्हावा, तसे घडले आणि त्याची हृदयक्रिया सुरू झाली आणि त्याने हातापायांची हालचाल केली.

आपण डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी तातडीने रियानला अतिदक्षा विभागात दाखल करत उपचाराला सुरुवात केली. तपासणीत रियान ब्रेन डेड झाला नसून त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा सुरू आहे. मात्र, तो कोमामध्ये आहे. तुम्ही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात, ते त्याच्यापर्यंत पोहचले. त्यावर त्याला प्रतिक्रिया द्यायची इच्छा झाल्याने त्याची हृयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि त्याने शरीराची हालचाल केली, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून तो अजूनही कोमामध्ये आहे. आपण बोललेले त्याला समजते. मात्र, तो प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, तो लवकरच बरा होईल, असा विश्वास आपल्याला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही त्याची हृदयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि त्याने शरीराची हालचाल केली, हा चमत्कार आपण स्वतः पाहिला आहे. त्यामुळे तो लवकर बरा होईल, असा विश्वास मेघन यांनी व्यक्त केला आहे.