Mumbai News – मुंबई विमानतळावर वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश, एका आरोपीला अटक

मुंबई विमानतळावर वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन सिल्व्हर गिबन जप्त करण्यात आले आहेत. आरोपीविरोधात कस्टम कायदा आणि वन्यजीव कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. सिल्व्हर गिबन हे निळसर राखाडी रंगाचे केस असलेले लहान माकड आहे. हे इंडोनेशियातील जावा बेटावर आढळते.

आरोपी बँकॉकहून मुंबईत आला होता. विमानतळावर तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये दोन सिल्व्हर गिबन आढळले. यापैकी एका गिबनचा मृत्यू झाला आहे. हा प्रवासी मलेशियाहून थायंडला गेला. थायलंडमध्ये सिंडिकेटच्या सदस्याने दिलेली गिबन असलेली बॅग घेऊन भारतात पोहचवण्यासाठी आला होता. मात्र तत्पूर्वीच सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली.