
सामना प्रतिनिधी । पणजी
राज्य सरकार माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार आहे. त्यांनी राज्याच्या विकासाची पाहिलेली स्वप्ने हे सरकार पूर्ण करेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले. सांगे येथे भाजप कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
सरकारचा कारभार हाकत असताना पर्रिकर आमच्यातून निघून गेले असले तरी उर्वरीत तीन वर्षे हे सरकार पर्रिकर सरकारचा वारसा पुढे चालवणार आहे. दोन वर्षे पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते आताही हे पर्रिकर यांचेच सरकार असेल. त्यांनी विकासाची दृष्टी आम्हाला दिली, त्याच मार्गावर सरकारची वाटचाल असेल, असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.


























































