मी मान आणि सन्मानाने लढणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांसोबत, राहुल गांधींच्या नव्या वर्षानिमित्त शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना परदेशात गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. मी मान आणि सन्मानाने लढणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांसोबत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नवीन वर्ष सुरू होत असताना ज्यांना आपण गमावले आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसेच ज्यांनी आपली सुरक्षा केली आणि बलिदान दिले त्या सर्वांचे आभार. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्य़ा शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.