
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ व उत्पादनांची विक्री वृध्दीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेष्टनासह विक्रीचा प्रयत्न करावा, असे आज प्रायोगिक तत्वावर विक्री केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून अशा पध्दतीने रेल्वे स्थानकावरही बचत गटांना विक्री मिळू शकेल. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर बचत गटांसाठी स्टॉल उपल्बध करून देणार असल्याचे रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. गणपतीपुळे येथे आज पासून सरस प्रदर्शन सुरू झाले.
यावेळी वायकर म्हणाले की, बचत गटांच्या पदार्थांना घरगुती विशिष्ट चव असते. महोत्सव, प्रदर्शन आदि मधून त्यांच्या पदार्थांना मोठी मागणी असते असे सांगून पालकमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की कोकणी पदार्थ, वस्तू यांच्या विक्रीसाठी रेल्वे स्थानक तसेच रेल्वे मधूनही या पदार्थांच्या विक्रीसाठी मी प्रयत्न करेन. यामुळे रेल्वे प्रवाशांनांही कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. गणपतीपुळे येथे नुकत्याच बुडत असलेल्या पर्यटकांना वाचविणाऱ्या जीवरक्षकांचा गौरव करुन ते म्हणाले रत्नागिरीच्या सर्व सागरी किनाऱ्यावर असे जीवरक्षक ठेऊन त्यांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याबाबत आवश्यक प्रयत्न करणार आहोत. यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षितपणे सागरी किनाऱ्यांचा आनंद घेता येईल. ते पुढे म्हणाले बचत गटांना मोक्याच्या ठिकाणी स्वयंपाकगृह उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करु यामुळे त्यांना कायमस्वरुपी उत्पादन विक्री होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिल्पा सुर्वे, महिला व बाल कल्याण सभापती साधना साळवी, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आरगे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, तालुक्यांचे गटविकास अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
विवेक पनवेलकर स्वागत प्रास्ताविकात म्हणाले महिला बचत गट स्टॉल्संना प्रसिसाद उत्तम आहे. विक्री कौशल्याचा अनुभव यावा यासाठी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ओहे. जिल्हयात 17 हजार 400 बचत गट असून त्यामाध्यातून 1 लाख 20 हजार महिलांचा यामध्ये समावेश आहे. उमेद अंतर्गत 450 ग्रामसंघ स्थापन झाले आहेत. स्वयंसहाय्यता बचत गट चळवळ चांगली रुजली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून फिरता महिला विक्री करणार आहेत.
यावेळी तालुकास्तरावर प्रथम, द्वीतीय व तृतीय पारितोषिक देऊन जिल्हयातील 9 तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दै. पुढारीचे वार्ताहार राजेश ज्योष्टे यांना सर्वोत्कृष्ठ पत्रकार म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेचे अमोल शांडगे यांचाही गौरव करण्यात आला.



























































