
बिहारमध्ये जदयू आणि आरजेडीप्रणित महागठबंधनचे सरकार स्थापन झाले आहे. आज जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर आरजेडीच्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये जदयूने भाजपला काडीमोड देत महागठबंधनसोबत नवे सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. एक दिवस देशात सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि भाजप राहणार असे विधान नड्डा यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा नितीशकुमार यांनी समाचार घेतला.
काही लोकांना वाटते की विरोधक संपून जातील. परंतु आता आम्हीही विरोधकांमध्ये आहोत, असे नितीशकुमार म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता निशाणा साधला. 2014 मध्ये आलेले 2024 मध्ये येतील याचा भरवसा काय? आम्ही असू किंवा नसू पण ते 2024 मध्ये नसतील, असे म्हणत नितीशकुमार यांनी सर्व विरोधकांना एकजूट होण्याचे आवाहनही केले. यावेळी आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Those who came to power in 2014, will they be victorious in 2024? I would like all (opposition) to be united for 2024. I am not a contender for any such post (on PM post): Bihar CM Nitish Kumar pic.twitter.com/XI7BPaAA9K
— ANI (@ANI) August 10, 2022
दरम्यान, बिहारमध्ये काल राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनामध्ये पार पडला. राजभवन येथील या शपथविधी सोहळ्याला लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हे देखील उपस्थित होते.
Bihar: Nitish Kumar swears in as CM for 8th time; Tejashwi Yadav to be Dy CM
Read @ANI Story | https://t.co/zTZ39XCRPG#NitishKumar #TejashwiYadav #BiharPolitics #Bihar pic.twitter.com/xFmXvMcIgo
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2022


























































